Tuesday, February 22, 2011

जीवन चक्र

काही क्षण येतात जीवनात, का आले म्हणून घाबरायचं नसतं,
जीवन हे असच असतं..
काही व्यक्ति भेटतात जीवनात, का भेटल्या म्हणून विचारायचं नसतं,
जीवन हे असच असतं..
काही धागे गुन्ततात हृदयात, का गुंतलात म्हणून तोडायचं नसतं,
जीवन हे असच असतं..
काही भोग भोगायचे असतात, भोगायचे, म्हणून रडायचं नसतं,
जीवन हे असच असतं..
काही प्रसंग येतात जीवनात, जीवनच पालटून टाकतात, का पालटले म्हणून
रागवायचं नसतं,
जीवन हे असच असतं..
काही व्यक्ति भेटतात, न विचारता जातात, का गेला म्हणून विचारायचं नसतं,
जीवन हे असच असतं..
जीवन म्हणजे काचेचं भांडं असतं, तडा लागू नये म्हणून जपायचं असतं,
जीवन हे असच असतं..
जीवन हे सुख-दुःखानें भरलेल्या जीवन चक्रासारखं असतं, कधी कमी, कधी वाढतं,
असं का म्हणून सोडायचं नसतं,
जीवन हे असच असतं..
कधी दोन्हीही संपून जाते, जीवन चक्र येथेच थाम्बते, का थांबले म्हणून
विचारायचं नसतं,
जीवन हे असच असतं,
जीवन हे असच असतं....

Thursday, February 17, 2011

कळत-नकळत.

चाहुल लगता त्याची, मन मोहरून जाते,
कळत-नकळतच वारयावर, एक गंध घेउन येते..
वेड्या मनाला माहित आहे की तो येणार आहे माज़्या भेटीसाठी,
पण तरीही हुरहुर लगते, तो भेटणार कधी?
मनाचा मोर नाचू लागला, प्रेमाचा चाहुलीने,
वाट पाहू लागले में त्याची, चातकाचा आतुरतेने॥
मित्र म्हणुनच आला तो आयुष्यात,
पण कळत-नकळतच शिरला ह्रुदयात..
आणि मग... धुंद ज़ालें शब्द सारे, धुंद ज़ाल्या भावना,
प्रेमरूपी सागराची में करू लागले अर्चना..